अलिबाबाचे जॅक मा स्थापणार ७ संशोधन केंद्रे


जगभरातील २०० कोटी लोकांवर परिणाम होऊ शकेल असा निर्णय ई कॉमर्स जायंट अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचा फायदा जगभरातील नागरिकांना होईलच पण त्यामुळे १० कोटी लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. जॅक मा हे जगातील श्रीमंतांच्या यादीत १३ नंबरवर असून त्यांची एकूण संपत्ती आहे ४७.१अब्ज डॉलर्स म्हणजे तीन लाख कोटी रूपये.

जॅक मा यांनी जगभर रिसर्च व विकास कार्यासाठी तीन वर्षात १५ अब्ज डॉलर्स म्हणजे १ लाख कोटींची गुंतवणूक करून संशोधन संस्था स्थापण्याच्या निर्णय घेतला आहे. यात नेक्स्ट जनरेशनचे नवे तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत संशोधन केले जाणार असून या प्रकल्पाचे नामकरण डॅमो असे केले गेले आहे. या प्रकल्पाअंतर्गत बिजिंग, हांग्जौ, सॅनमेटो, अमेरिकेतील बेलेव्यू, मास्को, तेल अवीव व सिंगापूर येथे सात संशोधन संस्था सुरू करण्यात येत आहेत. या संशोधक केंद्रांसाठी १०० संशोधकांची भरती केली जाणार आहे. या संशोधनाचा उपयोग २०० कोटी लोकांना सेवा देण्यासाठी होणार असल्याचा दावा केला जात आहे.

Leave a Comment