रोल्स रॉईसला मागे टाकणारी टोयोटोची सेंच्युरी कार


टोक्यो येथे होत असलेल्या मोटर शो मध्ये जपानच्या टोयटो ब्रँडची सेंच्युरी कार प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या शोमध्ये आर्टिफिशियल टेक्नॉलॉजी व फ्युचर मोबिलीटी वाहने पाहायला मिळतीलच पण सेंच्युरीवरच्या नजरा काढणे प्रेक्षकांना अवघड बनणार असल्याचा दावा केला जात आहे. टोयोटो या शेामध्ये ब्रँड न्यू सेंच्युरी सादर करत आहे.

वास्तविक टोयोटोचा सेंच्युरी ब्रँड ५० वर्षे जुना आहे मात्र या कारविषयी बाहेरच्या जगाला फारशी माहिती नाही. याचे कारण म्हणजे ती फक्त जपानमध्येच विकली जाते. महागड्या रोल्स रॉईस व लिमोसिन, ऑडी आर ८ चाही विसर ही कार प्रेक्षकांना पाडेल असा जाणकारांचा अंदाज आहे.या कारला ५.० लिटरचे व्ही ८ हायब्रिड सिस्टीम इंजिन दिले गेले असून तिचे डिझाईन पारंपारिक जपानी पद्धतीचेच आहे. ग्रील, लँप दिसायला सिंपल तरीही एलिगंट आहेत. रियर सीट साईडला रायटिंग टेबल, रिडींग लाईट, मोठ्या स्क्रीनसह एंटरटेनमेंट सिस्टीम,२० स्पीकर ऑडिओ, सेंट्रल आर्मरेस्ट, एलसीडी पॅनल, प्रत्येक सीटवर एसी व ऑडिओ कंट्रोल अशा अत्याधुनिक सुविधा दिल्या गेल्या आहेत.

१९६७ साली प्रथम ही कार बाजारात आली व ५० वर्षात ती फक्त तीन वेळा अपग्रेड करण्यात आली आहे.

Leave a Comment