टाटा ग्रुपच्या टाटा कम्युनिकेशन या मोबाईल व्यवसाय कंपनीची खरेदी भारती एअरटेलकडून केली जात असल्याचे दोन्ही कंपन्यांनी गुरूवारी जारी केलेल्या संयुक्त निवेदनातून स्पष्ट झाले आहे. या निवेदनानुसार हा व्यवहार डेब्ट फ्री व कॅशफ्री बेसिसवर होणार आहे. या व्यवहारामुळे भारती एअरटेलला टाटाचे ४ कोटी ग्राहक मिळणार आहेत.
टाटा टेलिकम्युनिकेशनची भारती एअरटेलकडून खरेदी
मिळालेल्या माहितीनुसार टाटांचे ३४ हजार कोटींचे कर्ज टाटा टेलिसव्र्हिसेसकडून फेडले जाणार आहे तर स्पेक्ट्रमसाठी भरायचे असलेले १५०० कोटी एअरटेल भरणार आहे. टाटा कम्युनिकेशनच्या खरेदीमुळे एअरटेलची ग्राहक संख्या ३१.२० कोटींवर जाणार आहे. याचा टाटा समुहाला असलेला सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांची कंपनी बंद पडण्यापासून वाचणार आहे. ही कंपनी बंद पडली असती तर टाटा ग्रुपची बंद होणारी ही पहिलीच कंपनी ठरली असती.