अॅपलची फोल्डेबल आयफोनची तयारी सुरू


सॅमसंगने २०१८ मध्ये त्यांचा फ्लॅगशीप गॅलेक्सी टेन फोल्डेबल स्क्रिनसह लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्धी अॅपलनेही एलजी डिस्प्लेच्या सहकार्याने फोल्डेबल आयफोन आणण्याची तयारी सुरू केली असल्याचे समजते. कोरियन वेबसाईट इन्व्हेंटर च्या रिपोर्टनुसार अॅपलने सॅमसंग ऐवजी एलजी बरोबर भागीदारी करण्यासाठी प्राधान्य दिले असून आपल्या फोनचे डिझाईन लीक तर होणार नाही ना अशी काळजी अॅपलला लागली आहे.

गुरूवारी द बेल ने दिलेल्या रिपोर्टनुसार एलजीने आयफोनसाठी नवे मॉडेल फोल्डेबल ओएलईडी स्क्रीनसह बनविण्यासाठी टास्क फोर्स स्थापन केला आहे. २०२० पासून या फोनचे उत्पादन सुरू केले जाईल असेही सांगितले जात आहे. सॅमसंग सध्या अॅपलच्या आयफोन टेनसाठी ओएलईडी पॅनल पुरवित आहे मात्र ही भागीदारी मोडून अॅपल एलजी सोबत नवीन घरोबा करण्याच्या विचारात आहे. तसेच एलजी अॅपलसोबत दीर्घकाळ एलसीडी भागीदार आहे.

Leave a Comment