इराकमध्ये आत्मघाती हल्ला; १० ठार


बगदाद – इराकमधील अनबार प्रांतात एका कॅफेवर झालेल्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात १० जण ठार झाले आहेत तर २० जण गंभीर जखमी झाले आहेत. हा आत्मघाती हल्ला बगदादपासून सुमारे १६० किलोमीटर अंतरावर असलेल्या हीट शहरातील कॅफेमध्ये झाला. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जखमींना शहरातील मुख्य रुग्णालय आणि वैद्यकीय केंद्रात भरती करण्यात आले आहे.

कोणीही या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नसली तरी अशा प्रकारच्या बहुतेक हल्ल्यांमध्ये इसिस या दहशतवादी गटाचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कीरकुक प्रांताच्या पश्चिम भागातील हवीजा परिसर इराकच्या लष्कराने दहशतवाद्यांपासून पूर्णपणे मुक्त केल्यानंतर हा आत्मघाती बॉम्ब हल्ला झाला आहे.