जीएसटीच्या कक्षेत ‘रिअल इस्टेट’ला आणणार – अरूण जेटली


नवी दिल्ली – रिअल इस्टेट क्षेत्रात सर्वांत जास्त कर चोरी होते. रिअल इस्टेटला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी हे कारण पुरेसे असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटले आहे. त्यांनी हे संकेत हार्वर्ड विद्यापीठात व्याख्यान देताना दिले आहेत. येत्या ९ नोव्हेंबरला याप्रकरणी गुवाहाटी येथे होणाऱ्या जीएसटी समितीच्या पुढील बैठकीत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जेटली म्हणाले, भारतातील रिअल इस्टेट हे क्षेत्र असे आहे की या क्षेत्रात कर चोरी आणि रोकड निर्माण मोठ्याप्रमाणात होते. पण ते अजूनही जीएसटीच्या कक्षेबाहेर आहे. यासाठी काही राज्य जोर देत आहेत. पण माझे वैयक्तिक मत असे आहे की जीएसटीच्या कक्षेत रिअल इस्टेटला आणले.