भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव, तर भाजप विजयी


मुंबई – मुंबई उपनगरातील भांडुपमधील प्रभाग क्रमांक ११६ च्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे आज सगळयांचे लक्ष लागले होते. या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार जागृती पाटील यांनी मोठा विजय मिळवला आहे. भाजप उमेदवार जागृती पाटील यांना एकूण ११२२९ मते मिळाली तर, शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांना ६३३७ मते मिळाली.

ही जागा काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झाली होती. ही जागा मिळविण्यासाठी भाजपने प्रमिला पाटील यांची सून जागृती पाटील यांना उमेदवारी दिली, तर शिवसेनेची मदार विद्यमान आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील यांच्यावर असल्यामुळे या प्रभागात दोन पाटलांमध्येच रस्सीखेच सुरू झाली. उभय पक्षांचे बडे नेतेच ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी प्रभागात तळ ठोकून होते.