सॅमसंग गॅलेक्सी सी ९ प्रो झाला स्वस्त


आपल्या गॅलेक्सी सी ९ प्रो या स्मार्टफोनच्या मूल्यात सॅमसंगने दोन हजार रूपयांनी कपात केल्यामुळे आता हा फोन ग्राहकांना २९,९९० रूपयात मिळणार आहे.

या वर्षाच्या जानेवारी महिन्यात भारतीय बाजारपेठेत तब्बल सहा जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज असणारा गॅलेक्सी सी ९ प्रो हा स्मार्टफोन ३६,९०० रूपये मुल्यात सॅमसंगने सादर करण्याची घोषणा केली होती. यानंतर तब्बल पाच हजार रूपयांनी याचे मूल्य घटविण्यात आले होते. यातच आता पुन्हा दोन हजार रूपयांची याचे मूल्य कमी करण्यात आले आहे. परिणामी हा स्मार्टफोन आता ग्राहकांना २९,९९० रूपयात मिळणार आहे.