राहुल गांधी महिलांच्या स्वच्छतागृहात ?


(छायचित्र सौजन्य – फायनानशीयल एक्सप्रेस)
अहमदाबाद – गुजराती भाषा न वाचता आल्यामुळे कॅाग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अडचणीत आले. राहुल गांधी यांच्या गुजरात दैाऱ्यात छोटा उदयपूर जिल्ह्यात हा प्रकार घडला.

गुजरातमध्ये डिसेंबरमहिन्यात होत असलेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची रॅली आयोजित केली होती. रॅली संपल्यानंतर ते अनावधाने पुरूषांच्या स्वच्छतागृहाऐवजी महिलांच्या स्वच्छतागृहात गेले. स्वच्छतागृहाच्या बाहेर गुजराती भाषेत लावलेली पाटी राहुल गांधी यांना वाचता आली नसल्यामुळे हा गोंधळ झाला, असे स्थानिकांनी सांगितले.

स्वच्छतागृहाच्या बाहेर पोलिस, एसपीजी कमांडर, त्यांचे अंगरक्षक व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी त्यांची वाट पाहत होते. तेथे उपस्थित असलेल्यांनी राहुल गांधी यांना महिलांच्या स्वच्छतागृहातून बाहेर येत असतांना पाहिले. अन् प्रसारमाध्यमाच्या छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेऱ्यात ही घटना टिपली