मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर – सोमय्या


मुंबई : खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईतील पोटनिवडणुकीत भाजपच्या विजयानंतर शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर थेट टीका केली आहे.

आता बृहन्मुंबई महानगरपालिकेत चिन्हानुसार शिवसेना ८४ आणि भाजप ८३ अशी स्थिती आहे. पण उद्धव ठाकरेंना मी आता असे खुले आव्हान देतो, भाजप ही स्थिती लवकरच बदलून ८४ आणि शिवसेना ८३ होऊन महापौरपदी आमच्या पक्षाचा उमेदवार बसेल, असे वक्तव्य सोमय्यांनी केले आहे. सोमय्या यांनी शिवसेनेवर टीका करतानाच उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला आहे. आता तरी उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा कमी होणार का? असे म्हणत सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली.

शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर मुंबई महापालिका निवडणुकीवेळीही सोमय्या यांनी बरीच टीका केली होती. शिवसेनेकडूनही त्यांना त्यावेळी प्रत्युत्तर देण्यात आले होते.