जय शहांच्या खटल्याची १६ ऑक्टोबरला पुढील सुनावणी


अहमदाबाद- ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाविरोधात जय शहा यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याची सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली असून सुनावणीदरम्यान तक्रारकर्त्यांचे वकील उपस्थित नसल्याने हा निर्णय महानगर न्यायालयाने घेतला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १६ ऑक्टोबरला पार पडणार आहे.

जय शहा यांच्या कंपनीच्या उलाढालीत वाढ झाल्याचे वृत्त ‘द वायर’ या संकेतस्थळाने प्रकाशित केले होते. शहा यांनी याला आक्षेप घेत १०० कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा महानगर न्यायालयात ठोकला आहे. या प्रकरणाची सुनावणी अहमदाबाद महानगर न्यायालयात होणार आहे. ‘द वायर’ चे रोहिणी सिंग, एस.वर्धराजन, सिध्दार्थ भाटिया,एम.के.वेणू, मोनाबिना गुप्ता, पामेला फिलीपोस यांना या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले आहे.