मोदींनी नोटबंदी करुन पांढरा केला काळा पैसा – राहुल गांधी


लिमखेडा – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदी लादून काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप केला. तसेच राहुल यांनी नोटबंदीचा निर्णय हा लहरीपणाचा असल्याची टीकाही केली आहे. दाहोड जिल्ह्यात गुजरात दौऱ्यावर असलेल्या राहुल यांची प्रचारसभा पार पडली. त्यांनी हा घणाघात यावेळी केला.

जीएसटीच्या सुधारणा टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी करण्याचा सल्ला काँग्रेसने सरकारला दिला होता. मोदी आणि जेटली यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. नोटबंदीच्या तडाख्यातून सामान्य नागरिक आणि छोटे व्यापारी सावरल्याचे मोदींना वाटल्यामुळेच त्यांनी जीएसटीची अंमलबजावणी सुरु केली असल्याचा उपरोधिक टोला राहुल यांनी लगावला. काँग्रेस सरकार जेव्हा सत्तेवर येईल तेव्हा लोकांची ‘मन की बात’ ऐकून घेईन असे राहुल यांनी म्हटले.