मोदी सरकारकडून होऊ शकत नाही राम मंदिराची उभारणी – केंद्रीय राज्यमंत्री


नवी दिल्ली – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपने निवडणूक लढवलेली नसल्यामुळे राम मंदिराची उभारणी केंद्र सरकार कधीही करु शकणार नाही, असे विधान केले आहे. शुक्ला यांनी लोकसभा निवडणुकीला दीड वर्षांचा कालावधी शिल्लक असताना केलेले वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे. आमच्या सोबत कायमच प्रभू राम असतील. राम मंदिराची उभारणी न्यायालयाच्या निर्णयानंतर किंवा आपापसातील सहमतीनेच होईल, असेही त्यांनी म्हटले.

लखनऊला जाण्याआधी बस्ती येथील मुडघाट येथे केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप थांबले होते. भाजप कार्यकर्त्यांनी याठिकाणी त्यांचे स्वागत केले. शिवप्रताप शुक्ला यांनी यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी राम मंदिराच्या मुद्यावर यावेळी भाष्य केले. राम मंदिराच्या मुद्यावर आम्ही (भाजपने) निवडणूक लढवलेली नसल्यामुळे राम मंदिराची निर्मिती केंद्र सरकार करु शकत नसल्याचे शुक्ला यांनी म्हटले. राम मंदिराच्या उभारणीला न्यायालयाच्या निकालानंतर किंवा आपापसात एकमत झाल्यावरच सुरुवात होऊ शकते, असेही ते पुढे म्हणाले.