जाणून घ्या ७५ वा वाढदिवस साजरा करण्यामागचे कारण!


बॉलीवूडचे महानायक आणि बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांचा ७५ वा वाढदिवस धुमधडाक्यात पार पडेल अशी अपेक्षा सर्वांनाच होती. पण तसे काही घडले नाही. आपला वाढदिवस साजरा करणार नसल्याचे खुद बच्चन यांनी सांगितल्यामुळे बच्चन परिवाराने कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन केले नाही.

बिग बींच्या वाढदिवसाची ऐश्वर्या राय बच्चनने जोरदार तयारी सुरू केली होती. अमिताभ यांना याची चाहूल लागली आणि त्यांनी तातडीने तयारी थांबवण्याचे आदेश दिले. यावर्षी ऐश्वर्याच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे बच्चन यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. जया बच्चन यांनी त्यांच्या या निर्णयाला संमती दिली आणि धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना रद्द झाली.

बिग बींचा वाढदिवस ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर साजरा झाला होता. पण हे सेलिब्रेशन वाढदिवसाच्या आधीच झाले होते. ११ ऑक्टोबरला अमिताभ घरी राहिले तर मित्र परिवार शुभेच्छांसाठी वर्दळ करेल अशी अटकळ बांधण्यात आली. त्यामुळे यादिवशी बच्चन परिवारातील सर्वांनी फिरण्याचा बेत केल्याचे समजते. त्यांनी हा दिवस कसा घालवला याबद्दलची सर्वांनाच उत्सुकता आहे.