जिओची ३९९च्या रिचार्जवर स्पेशल ऑफर


मुंबई – ‘दिवाळी धन-धना-धन ऑफर’ अशी नवीन ऑफर रिलायन्स जिओने आणली असून ग्राहकांना यामध्ये ३९९ रूपयांच्या रिचार्जवर १०० टक्के कॅशबॅक मिळणार आहे. ही ऑफर १२ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर दरम्यान असणार आहे.

जिओच्या दिवाळी धन-धना-धन ऑफरमध्ये ग्राहकांना ३९९ रूपयांच्या रिचार्जवर व्हाउचर स्वरूपात १०० टक्के कॅशबॅक मिळणार आहे. ग्राहकांना ५० रूपयांचे ८ व्हाउचर मिळतील. हे ८ व्हाउचर्स My Jio अॅपमध्ये मिळतील. या व्हाउचर्सचा फायदा भविष्यात ३०९ रूपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज किंवा ९१ रूपये आणि त्यापेक्षा जास्तीचा डेटा रिचार्ज करताना घेता येणार आहे. पण या व्हाउचर्सचा वापर १५ नोव्हेंबर नंतरच करता येणार आहे.