३ लाख भारतीय युवकांना जपानमध्ये ऑनजॉब प्रशिक्षण मिळणार


केंद्रीय कौशल्य विकास मंत्री धर्मेंद प्रधान यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत भारतातील ३ लाख युवकांना ३ ते ५ वर्षां च्या कालावधीसाठी जपानमध्ये ऑनजॉब प्रशिक्षण दिले जाणार आहे. या भारतीय तंत्र इंटर्न्सचा प्रशिक्षण खर्च जपानकडून केला जाणार आहे. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या एमओयूला मंजुरी दिली गेली आहे. प्रधान १६ आक्टोबरला तीन दिवसांच्या दौर्‍यावर जपानला जात आहेत तेथे या एमओयूवर सह्या करण्यात येणार आहेत.

प्रधान यांनी ट्वीटरवरून दिलेल्या माहितीनुसार येत्या तीन वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने ३ लाख भारतीय युवकांना ऑनजॉब प्रशिक्षणासाठी जपानला पाठविले जाईल. या कालावधीत हे युवक तेथे काम करतील व त्यातील ५० हजार जणांना जपानमध्येच रेाजगारही मिळेल. या प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड पारदर्शक पद्धतीने केली जाईल व जेव्हा हे युवक जपानमधून कौशल्ये आत्मसात करून भारतात येतील तेव्हा येथील उद्योगव्यवसायात त्यांना संधी मिळू शकेल.

Leave a Comment