मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या स्वीडन दौऱ्यावर


स्टॉकहोम- तीन दिवसांच्या स्वीडन दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेले असून त्यांच्या शिष्टमंडळात शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचाही सहभाग आहे. आघाडीच्या ‘साब’ या सुरक्षा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली.


या दौऱ्यात स्वीडनच्या उद्योपतींसोबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे शिष्टमंडळ चर्चा करणार आहेत. तसेच त्यांना भारतात महत्वाकांक्षी प्रकल्पांवर गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रण देणार आहेत.