Skip links

भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने यशवंत सिन्हांना म्हटले गद्दार


नवी दिल्ली – भाजपच्या नेत्यांनी देशाची अर्थव्यवस्था आणि केंद्र सरकारच्या कारभारावरून मोदी सरकारवर टीका करणारे माजी वित्तमंत्री यशवंत सिन्हा यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून आता केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो हेही सिन्हांवर टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये सामील झाले आहेत. काश्मीरमधील फुटीरतावाद्यांची यशवंत सिन्हा यांनी भेट घेतल्यानंतर त्यांना सुप्रियो यांनी टीकेचे लक्ष्य केले असून, त्यांचा उल्लेख देशद्रोही, गद्दार असा केला आहे.

देशाच्या आर्थिक स्थितीवरून मोदी सरकारला धारेवर धरणाऱ्या यशवंत सिन्हा यांनी जय शहा यांच्या संपत्तीच्या मुद्यावरूनही भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. भाजपने जय शहा प्रकरणात आपली नैतिकता गमावली आहे. केंद्रीय मंत्री ज्यापद्धतीने त्यांच्या बचावासाठी उभे राहत आहेत, त्यावरून डाळीत काहीतरी काळे असल्याचे सिद्ध होत असल्याची शंका यशवंत सिन्हा यांनी उपस्थित केली होती.

दरम्यान बाबुल सुप्रियो यांनी ट्विटरवरून या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. हे काय करत आहेत यशवंत सिन्हा. भाजपला देण्यासारखे आता त्यांच्याकडे काही राहिलेले नाही. पण त्यांनी केलेल्या आरोपांना आमच्यासारख्या नव्या पिढीला प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण हक्क आहे. आमचेच नुकसान ते का करत आहेत? असा सवाल त्यांवी उपस्थित केला.

Web Title: BJP Union Minister told Yashwant Singh is Gaddar