निवड समिती अजिंक्य रहाणेवर नाराज


मुंबई : अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एक दिवसीय मालिकेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. ५ सामन्याच्या या मालिकेमध्ये अजिंक्य रहाणेने लागोपाठ ४ अर्धशतके झळकावली. अजिंक्य रहाणेला या कामगिरीनंतरही टी-२० मालिकेतून डच्चू देण्यात आल्यानंतर रहाणे त्याची पत्नी राधिकासोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. राधिका आणि अजिंक्य सेशल्समध्ये गेले आहेत.

अजिंक्य रहाणे २०१७-१८च्या रणजी मोसमाला सुरुवात झाली असताना मात्र सुट्टीवर आहे. मुंबईचा १४ ऑक्टोबरला मध्य प्रदेशशी सामना होणार आहे. पण या सामन्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचे अजिंक्य रहाणेने मुंबईच्या निवड समितीला कळवले आहे. निवड समिती अजिंक्यच्या या निर्णयामुळे नाराज झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवड समितीनेही अजिंक्य रहाणेच्या या निर्णयाबाबत आश्चर्यही व्यक्त केल्याची चर्चा आहे.