एअरटेलचा स्वस्तातला ४जी स्मार्टफोन


नवी दिल्ली – टेलिकॉम क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या भारती एअरटेलने कार्बन मोबाईल्स या कंपनीबरोबर अल्प किमतीतील ४जी स्मार्टफोन सादर करण्यासाठी भागीदारी करण्यात आल्याची घोषणा केली. १३९९ रुपयांत टचस्क्रीन, डय़ुअल सिम असणारा मोबाईल कंपनीकडून सादर करण्यात येईल. या फोनमध्ये युटय़ुब, व्हॉट्सऍप, फेसबुक या ऍपचा वापर करता येईल.

कार्बन ए४० इंडियन या नावाने भारती एअरटेलकडून स्मार्टफोन दाखल करण्यात येईल. यानंतर प्रतिमहिना १६९ रुपयांची मासिक रिचार्ज करावे लागणार. मर्यादित प्रमाणात डेटा आणि कॉलिंग असणा-या या फोनमध्ये संच उपलब्ध असेपर्यंत विक्री करण्यात येईल. हा ४जी फोन २८९९ रुपयांचे डाऊन पेमेन्ट केल्यावर ग्राहकांना मिळेल. पुढील ३६ महिन्यांपर्यंत १६९ रुपयांचे मासिक रिचार्ज करावे लागेल. १८ महिन्यानंतर ५०० रुपये आणि ३६ महिन्यानंतर उर्वरित १ हजार रुपये ग्राहकाला परत मिळतील. या फोनची सध्या बाजारात ३४९९ रुपये ऐवढी किंमत आहे.

Leave a Comment