कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या वणव्यामध्ये २१ जणांचा मृत्यू


वॉशिंग्टन – उत्तर कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या वणव्यामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या २१ वर पोहोचली असून अजूनही आजूबाजूच्या परिसरातील आग विझवण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाचे शेकडो अधिकारी करत आहेत. जवळपास दोन लाख रहिवाशांना या वणव्यामुळे सुरक्षित जागी हलवण्यात आले आहे.

यासंदर्भात नॅशनल इंटरएजेन्सी फायर सेंटरने दिलेल्या माहितीनुसार आग विझवण्यासाठी २७०० हून अधिक अग्निशामक आणि मदतकर्ते प्रयत्न करत असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, कॅलिफोर्नियातील लोकांच्यासोबत सरकार आहे. या भागाचा वणव्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे.

नापा आणि सोनोमा यासह आठ राज्यात कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर जेरी ब्राउन यांनी आपत्कालीन परिस्थिती घोषित केली होती. फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने फेडरल फंडच्या विनंतीनंतर कॅलिफोर्नियाला मदत करण्यासाठी सहमती दर्शविली आहे.