अटलांटिक महासागरातील विंड पार्क भागवेल जगाची उर्जा गरज


उत्तर अटलांटिक महासागरात ३० लाख चौरस किमी परिसरात विंड पार्क म्हणजे पवनचक्कया उद्यान उभारले गेले तर संपूर्ण जगाची उर्जेची गरज येथे निर्माण होणार्‍या वीजेमधून भागू शकते असे संशोधन प्रोसिडींग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले अ्राहे. डॉ. अॅना पॉसनर व कॅन कॅलाडरा या वैज्ञानिकांनी हे संशोधन केले आहे.

या संशोधकांच्या म्हणण्यानुसार उत्तर अटलांटिक महासागरात साधारण भारत देशाच्या आकाराइतक्या परिसरात विंड पार्क उभारले गेले तर जगाची उर्जाभूक भागू शकते. या भागात ताशी ७० किमी पर्यंत वेगाने सतत वारे वाहतात व त्यामुळे जमिनीवरील विंड पार्कच्या तुलनेत येथे १ चैारस मीटर भागात ६ वॉट वीज निर्माण होऊ शकते. जमिनीवर इतक्या भागात वीज निर्मितीचे प्रमाण १.५ वॉट पर्यंत असते.

अर्थात हे पार्क उभारण्यात कांही समस्या येऊ शकतात. म्हणजे या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय सहमती मिळविणे हे मोठे आव्हान आहे तसेच त्यासाठी आवश्यक असलेली प्रचंड गुंतवणूक कोण करणार हा मोठा प्रश्न आहे असे या संशोधकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment