कुठेही पळाले तरी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांना अटक करणारच : नांगरे- पाटील


सातारा: गुरुवारी मध्यरात्री साताऱ्यात दोन्ही राजे अर्थात खा. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यात झालेल्या राड्याप्रकरणी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

आनेवाडी टोलनाक्याच्या कंत्राटावरुन उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात राडा झाला होता. पोलिसांकडून याप्रकरणी अटकसत्र सुरु आहे. दरम्यान गुन्ह्यातील प्रत्येकाचा सहभाग पाहून कठोर कारवाई करु, मग तो कोणीही असो सर्वांसाठी कायदा समान असल्याचे विश्वास नांगरे पाटील म्हणाले. त्याचबरोबर या राड्यात सहभागी असणारे आरोपी पळून पळून कुठे जातील? ते कुठेही पळाले तरी त्यांना अटक होणार हे अटळ आहे, असा थेट इशारा नांगरे पाटील यांनी दिला. या संदर्भातील वृत्त एबीपी माझाने दिले आहे.