पुण्यातला आणखी एक गोल्डमन सनी वाघचौरे


महाराष्ट्रात सोनवेड्यांची संख्या कमी नाही. कुणी सोन्याचे शर्ट, कुणी सोन्याचे भलेभक्कम अलंकार घालून आपल्याकडील सोन्याचे प्रदर्शन करत असतात. दत्ता फुगे, आमदार रमेश वांजळे, नाशिकचे पंकज पारिख अशी काही नावे या संदर्भात चांगलीच गाजलेली आहेत.त्यात आता सनी वाघचौरे या पिंपरी चिंचवड परिसरात राहणार्‍या एका युवकाची भर पडली आहे. त्याचे मित्रांसमवेतचे कांही फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. हाता गळ्यात सोन्याचे जडशीळ दागिने घालून सनी यात दिसतो आहे.


सनीचे बॉलीवूड तसेच राजकीय क्षेत्रातील बड्या व्यक्तींशी जवळचे संबंध असल्याचे सांगितले जाते. त्याचा उद्योग नक्की काय हे मात्र समजलेले नाही. विवेक ओबेराय त्याचा खास मित्र आहे तर करिना कपूर, मल्लीका शेरावत यांच्यासोबत त्याचे कांही फोटो झळकले आहेत. सनी सांगतो त्याला लहानपणापासून सोन्याची खूप आवड आहे. तो गळ्यात हातात जडजड साखळ्या, ब्रेसलेट, घड्याळ घालतोच पण त्याच्याकडे सोनेरी ऑडी व सोन्याचे बूटही आहेत. दोन बॉडीगार्डना सोबत घेऊन तो फिरतो. त्याचे मित्रही असेच सोन्याने मढून त्याच्याबरोबर असतात. कपिल शर्मा शोमध्ये सनी झळकला आहे.

दत्ता फुगे त्यांच्या साडेतीन किलेा वजनाच्या सोन्याच्या शर्टमुळे तर नाशिकचे पंकज पारिख त्यांच्या अंगावरील ४ किलो सोन्यामुळे चर्चेत आले होते. शिवसेना आमदार अनूप स्वरूप हेही दोन किलो सोने अंगावर बाळगून असतात.