जाणून घ्या व्हायरल झालेल्या ‘या’ फोटोमागील सत्य


अनंतपूर – सध्या सोशल मीडियावर आंध्र प्रदेशातील अनंतपूरमधील एका दुचाकीवर चार जणांना घेऊन जात असताना त्या दुचाकीस्वाराला पोलीस अधिकारी हात जोडत असलेला फोटो व्हायरल होत आहे. हनुमंत रायडू नावाची व्यक्ती आपल्या कुटुंबातील चार सदस्यांसोबत एका दुचाकीवरून येत असल्याचे पोलीस निरिक्षक बी. शुभ कुमार ड्यूटीवर जात असताना त्यांना दिसले. त्यांनी या व्यक्तीला पाहून त्यांचे हात जोडले.

हनुमंत रायडू हे पोलिसांनी घेतलेल्या रस्ता सुरक्षा कार्यक्रमादरम्यान उपस्थित होते. पोलीस निरीक्षक बी. शुभ कुमार यांना कार्यक्रम संपल्यावर एका दुचाकीवर पाच जणांना घेऊन जाताना पाहून धक्काच बसला. हनुमंत रायडूंसमोर यामुळे त्यांनी हात जोडले. त्यांनी हनुमंतला निदान स्वत:च्या कुटुंबाच्या सुरक्षेचा तरी विचार करा, असा सल्ला दिला. तसेच या व्यक्तीला पूर्वीही अनेक वेळा वाहतुकीचे नियम मोडल्याने पकडले असल्याची माहितीही पोलिसांनी दिली. कर्नाटकचे आयपीएस अधिकारी अभिषेक गोयल यांनी पोलीस निरीक्षक बी. शुभ कुमार यांचा हाच हात जोडल्याचा फोटो ट्विट केला आहे.