पाखराच्या घरट्यात आराम करण्याची संधी


रोजच्या धकधकीच्या आयुष्यात रिलॅक्स होण्याच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असतात. कांही जणांना कुणी त्रास देऊ नये अशा एकांतातील जागा आवडतात तर कांहीना निसर्गात रमणे आवडते. कांही ना जंगलाची भटकंती भावते तर कांहींना बर्फाळ शिखरांवरची चढाई वेगळा उत्साह देऊन जाते. ज्यांना जंगलाच्या मधोमध अगदी एकांतात तेही आजूबाजूला वन्य प्राण्यांच्या सहवासात राहण्याची व रिलॅक्स होण्याची आवड असेल तर त्यांच्यासाठी केनियातील एक रिसॉर्ट अगदी तयार आहे.


नदी किनारी दाट जंगलात उभारले गेलेले हे रिसॉर्ट लांबून पाखराच्या घरट्यासारखे दिसते. केनियातील लाईकिपी भागात चारीबाजूंनी जंगलाने वेढलेल्या नदीकाठी हे रिसॉर्ट झाडाच्या फांद्या व लाकडांपासून स्थानिक कामगारांनी तयार केले आहे. आतील सुविधा मात्र पंचतारांकित हॉटेलसारख्या आहेत. सुंदर सजलेल्या बाथरूम्स, स्वच्छ बेडवरील लिनन चादरी, कंदिलांचा उजेड, गरम पाणी, गरमागरम चवदार नाश्ता या सोबत येथे शँपेनही मिळते. अर्थात या रिसॉर्टमध्ये एका वेळी दोन ते चार प्रवासीच राहू शकतात. व त्यासाठी रात्रीला ७५ हजार रूपये भाडे मोजावे लागते.

Leave a Comment