यंदाची दिवाळी सात दिवसांची?


दिवाळी हा चार दिवसांचा सण असला, तरी पंचांगानुसार प्राचीन धर्मशास्त्र पाळायचे असेल, त्यांच्यासाठी यंदाची दिवाळी चार नव्हे तर सात दिवसांची आहे, असे संस्कृत तज्ज्ञ पं.वसन्तराव गाडगीळ यांनी म्हटले आहे.

“रमा एकादशी रविवार, 15 ऑक्टोबर ते यमद्वादशी शनिवार, 21 ऑक्टोबर भाऊबीजपर्यंत सात दिवस अशी दिवाळी आहे. त्या त्या दिवसाचें सांस्कृतिक महत्त्व जाणून साजरी करावी”, असे आवाहन पं. गाडगीळ यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. एमआयटीच्या डॉ. विश्‍वनाथ कराड विश्‍वशांती विश्‍वविद्यालयाचे ते कुलाचार्य आहेत.

प्रत्येक महिन्यांत दोन आणि संपूर्ण वर्षात एकूण 24 एकादशी येतात. त्यापैकी दीपोत्सवाच्या आरंभाची आश्‍विन कृष्ण एकादशीच फक्त देवता श्रीलक्ष्मी हिचे नाव असणारी रमा एकादशी असते. यावर्षी रविवारी रमा एकादशी आहे. सोमवार, दि.16 ऑक्टोबरला गुरूद्वादशी व वसुबारस (गोवत्स द्वादशी) आहे. मंगळवार, दि.17 रोजी धनत्रयोदशी आहे. बुधवार, दि. 18 रोजी नरक चतुर्दशी, गुरुवार, दि. 19 रोजी रात्री लक्ष्मीपूजन, शुक्रवार, दि. 20 रोजी दिवाळी पाडवा आणि सातव्या दिवशी दि. 21 रोजी शनिवारी बहिण-भावाच्या चिरंतन प्रेमाचे / स्नेहाचे प्रतीक असलेल्या भाऊबीज ओवाळणीने दिवाळी सप्ताहाची सांगता करावी, असे पं. गाडगीळ यांनी म्हटले आहे.

Leave a Comment