हायपर कार अगेरा आरएस ठरली बुगाटीच्या चिरोनपेक्षाही वेगवान


स्पोर्टसकार बनविणारी स्वीडीश कंपनी कोनिगसॅग ऑटोमोटिव्ह च्या अॅगेरा आरएस या सुपर नव्हे तर हायपरकारने ऐतिहासिक जागतिक रेकार्ड नोंदवित जगातील सर्वात वेगवान कार म्हणून नोंद केली आहे. आत्तापर्यंत बुगाटीच्या चिरोन च्या नावावर असलेले सर्वात वेगवान कारचे रेकार्ड मोडताना अगेराने ० ते ४०० किमीचा वेग अवघ्या २६.८८ सेकंदात घेतला.

या कारने ०ते ४०० किमीचा वेग ते पुन्हा ताशी ० किमी वेगावर येण्यासाठी ३६.४४ सेकंद घेताना अडीच किलोमीटरचे अंतर कापले. ४०० चा वेग गाठण्यासाठी तिला २६.८८सेकंद तर पुन्हा ० वेगावर येण्यासाठी ९.५६ सेकंद लागली. बुगाटीच्या चिरॉनने ० ते ४०० चा वेग ४१.९६ सेकंदात घेतला होता व ती जगातील वेगवान कार ठरली होती. अगेरा आरएस कारला ५.० लिटरचे व्हीआठ टर्बो ट्वीन इंजिन दिले गेले असून तिची किंमत आहे ३.३ दशलक्ष डॉलर्स म्हणजे २१ कोटी रूपये.

Leave a Comment