मुंबई : आबालवृद्धांमध्ये व्हॉट्सअॅप हे सध्याच्या घडीला लोकप्रिय मेसेजिंग अॅप असून लवकरच आता व्हॉट्सअॅप त्यांचे एक लोकप्रिय फीचर बंद करण्याचा विचार करत आहे. याबाबतची टेस्टिंग सध्या सुरू असल्याची माहिती @WABetaInfo या ट्विटर हॅन्डलने दिली आहे.
व्हॉट्सअॅप बंद करणार आपले लोकप्रिय फीचर
युजर यापूर्वी नाव टाकताना त्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर किंवा इमोजीचा वापर करू शकत होता मात्र आता तुम्हाला केवळ तुमचे नाव लिहण्याची मुभा देण्यात आली आहे. सिक्युरिटीमध्ये यापूर्वीही बदल करताना व्हॉट्सअॅपने संदेश वाचण्याची संधी केवळ पाठवणार्याला आणि संदेश मिळणार्या व्यक्तीला मिळणार आहे. या दोघांव्यतिरिक्त कोणतीही संस्था हा मेसेज वाचू शकणार नाही. त्यांच्या फीचर्समध्ये सध्या व्हॉट्सअॅप अनेक बदल करत आहेत. लवकरच सर्च इमोजी ऑप्शन,फॉन्ट स्टाईल, गुगल ड्राईव्ह वर चॅटचा बॅक अप, तसेच आवश्यक असणार्या मेसेजलाही बुकमार्क करण्याची सोय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.