अर्थ नोबेल विजेते रिचर्ड यांनी केले होते नोटबंदीचे समर्थन


नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर करण्यात आलेली नोटबंदी व आता जीएसटी यावरून मोदी सरकार विरोधकांसोबत स्वपक्षीयांच्या टीकेचा भडीमार सहन करत असतानाच अर्थशास्त्राचे नोबेल विजेते रिचर्ड थेलर यांनी मात्र त्यावेळीच नोटबंदीचे समर्थन केले होते हे त्यांच्या ट्वीट वरून निदर्शनास आले आहे. रिचर्ड भारतीय अर्थव्यवस्थेचे गाढे अभ्यासक आहेत.

नोटबंदीनंतर लगेचच त्यांनी कॅशलेस इंडियाच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल असल्याचे सांगत नोटबंदीचे आपण दीर्घकाळ समर्थक आहोत असे टिवट केले होते. भ्रष्टाचारावर नियंत्रणाची ही चांगली सुरवात असल्याचेही त्यानी म्हटले होंते तसेच भारत सरकार २ हजार रूपयांची नोट चलनात आणत असल्याच्या बातमीवर असमाधान व्यक्त केले होते. मोदींच्या जनधन योजनेचेही त्यांनी समर्थन केले होते व भारत व ग्रीस सारख्या देशांना भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी नोटबंदी सारखे उपायच उपयुक्त ठरू शकतात असे मत व्यक्त केले होते..

रिचर्ड यांच्या नोटबंदी व जनधन वरील मताला विशेष महत्त्व मिळण्याचे कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नोटबंदीला विरोध केला होता. रघुराम राजन यांचेही नांव अर्थशास्त्रासाठीच्या नोबेल यादीत होते.

——-

Leave a Comment