‘राधे माँ’चा मॉडर्न ड्रेसमध्ये अश्लील डान्स


चंदीगड – पुन्हा एका वादात अडकल्याने स्वत:ला देवीचा अवतार म्हणणाऱ्या राधे माँ चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर राधे माँचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राधे माँ या व्हिडिओमध्ये मॉडर्न ड्रेस नेसून अश्लील नृत्य करताना दिसत आहे.


(व्हिडीओ सौजन्य – CDS Bollywood Tweets)

राधे माँच्या सभोवताली तिचे भक्त २० सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये उभारलेले दिसत आहेत. बॅकग्राउंडला त्याचवेळी पंजाबी गाणे चालू असून काळ्या आणि लाल रंगचा ड्रेस घातलेल्या राधे माँने अचानक या गाण्यावर अश्लील नृत्य चालू केल्यानंतर तिने आपला खास असलेल्या टल्ली बाबाच्या कडेवर बसून नृत्य करण्यात दंग झाली. राधे माँच्या या कृत्यानंतर हा टल्ली बाबाही घुमायला लागून दोघांनी मिळून अश्लील नृत्य चालू केले. या नृत्याचा व्हिडिओ उपस्थितांपैकी काहींनी आपल्या मोबाईलवर बनविला.

हा काही दिवसांपुर्वीचा व्हिडिओ असून याचे लोकेशन मुंबई असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर खुपच व्हायरल झाला असून राधे माँच्या असल्या अश्लील नृत्यामुळे तिची खुपच निंदा होत आहे.

टिप : व्हायरल झालेल्या या व्हिडिओची पृष्टी माझा पेपर करत नाही.