ब्लॅकबेरी मोशन स्मार्टफोन सादर


चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी टीसीएलने ब्लॅकबेरी मोशन अँड्राईड स्मार्टफोन बाजारात आणला असून हा मिडरेंज फोन आहे. दुबईत झालेल्या टेक्नॉलॉजी विक कॉन्फरन्समध्ये तो सादर करण्यात आला. हा फोन प्रथम यूएई व सौदी मध्ये विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. त्याची किंमत आहे ४६० डॉलर्स.

या फोनसाठी ५.५ इंची फुल एचडी स्क्रीन ड्रॅगन टेल ग्लास प्रोटेक्शन सह दिला केला आहे. डिस्प्ले खालीच होमबटण आहे. ड्युअल सिम, अड्राईड नगेट ७.१.१, ४जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी ती मायक्रो चीपच्या सहाय्याने २ टीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा,४००० एमएएच ची नॉनरिमुव्हेबल बॅटरी, क्विकचार्ज ३.० ला सपोर्ट करते. यूबीएस टाईप सी पोर्ट, १२ एमपीचा रियर ड्युल टोन एलईडी फ्लॅशसह कॅमेरा, ८ एमपीचा सेल्फी कॅमेरा फ्लॅशसह दिला गेला आहे. हा फोन वॉटर रेसिस्टंट असून त्याच्या फ्रंट पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सरही दिला गेला आहे.

Leave a Comment