असा बनतो आहे रजनीकांत-अक्षय कुमारचा ‘२.०’


बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार हा पहिल्यांदाच सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत बहुचर्चित ‘२.०’ या चित्रपटाच्या माध्यमातून स्क्रीन शेअर करत आहे. अक्षय कुमार यात खलनायकाची भूमिका साकारली आहे. बॉलिवूडचा खिलाडी कुमार यात एका दुष्ट शास्त्रज्ञाची भूमिका साकारणार असून नुकतेच चित्रपटाच्या मेकिंगचा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आले आहेत.

या चित्रपटात काम करण्याचा अनुभव या व्हिडिओमध्ये एस. शंकर, रजनीकांत, अक्षयसोबत इतर तांत्रिक कलाकारांनी शेअर केला. हा एक ३डी चित्रपट असणार आहे. पण सर्वसामान्यपणे बॉलिवूडमध्ये ज्या पद्धतीने ३-डीचा वापर केला जातो तसा वापर न करता संपूर्ण चित्रपट हा ३डी स्वरुपातच चित्रीत करण्यात आला आहे.

सर्वोत्तम ३डी टेक्नॉलॉजीचा वापर या चित्रपटासाठी करण्यात आला असून अक्षय आणि रजनीकांत यांनी सांगितले की चित्रपटातील प्रत्येक दृश्य चित्रीत झाल्यानंतर ते दृश्य ३डी चश्मा घालून पाहायचे. चित्रपटातील प्रत्येक दृश्य हे फार सुंदररित्या चित्रीत करण्यात आले आहे आणि प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल अशी आशा ‘रोबोट २.०’ च्या टीमला आहे.

रजनीकांत यांच्या ‘रोबोट’ चित्रपटाचा हा चित्रपट सिक्वल आहे. पण या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत अक्षय दिसणार आहे. निर्मात्यांनी प्रदर्शित केलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये रजनीकांत आणि अक्षय यांना तयार व्हायला किती वेळ लागायचा ते दाखवले होते. या चित्रपटाला ए.आर. रेहमानने संगीत दिले असल्यामुळे या चित्रपटाचे संगीतदेखील एक जमेची बाजू असेल. हा चित्रपट पुढच्या वर्षी २५ जानेवारीला प्रदर्शित केला जाणार आहे.