विराट कोहली खेळताना म्हणतो ‘म्याऊं -म्याऊं’


रांची – भारतीय क्रिकेट टीमचे कप्तान विराट कोहली यांना लहान मुलांविषयी विशेष जिव्हाळा आहे. ऑस्ट्रेलियाच्या विरोधात टी-20 मालिका खेळण्यासाठी विराट कोहली रांची येथे आला होता. या दैाऱ्यात विराट हा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांच्या घरी गेला.

महेंद्र सिंह धोनी यांच्या मुलगी जीवा हीच्यासोबत विराट याने खूप मस्ती केली. या सुखद क्षणांचा व्हिडिओ विराट यांनी इस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यावर त्याने लिहिेले आहे की ‘जीवाला पुन्हा भेटलो. या चिमुरडीसोबत खेळतांना खूप आनंद वाटला. हा व्हिडिओ महेंद्र सिंह धोनी याच्या फार्म हाऊसवरील आहे. यात विराट कोहली जीवासोबत खेळत असताना ‘म्याऊं -म्याऊं’असा आवाज काढतात. तिला विचारतात कुठनं आवाज आला. जीवा म्हणते कोणी आवाज काढला… विराट म्हणतात.. जीवाने आवाज काढला.. जीवा म्हणते..मांजरीने आवाज काढला. यावर विराट कोहली पुन्हा ‘म्याऊं -म्याऊं’करून जीवाला घाबरविण्याचा प्रयत्न करतो.


रांची येथे धोनीने सात एकर परिसरात फार्म हाऊस तयार केला आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंना त्याने जेवायला बोलाविले होते. या वेळी फार्म हाऊसवर मोठा मंडप टाकण्यात आला होता. याठिकाणी धोनीने आपल्या मित्रांसोबत जेवणाचा आनंद लुटला.