टाटा टेलिसव्हिसेज् बंद होणार ?


नवी दिल्ली – टाटा समुहाची सर्वात मोठी कंपनी टाटा टेलिसव्हिसेज् आपल्या पाच हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यासाठी “एग्जिट प्लान” तयार करीत आहेत. इकोनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार कर्मचाऱ्यांना तीन ते सहा महिन्यांचा नोटीस पीरियड देण्यात येणार आहे.

जे कर्मचारी नोटीस पीरियडच्या अगोदर राजीनामा देतील त्यांना अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे. वरिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ति योजना (व्हीआरएस) लागू करण्यात येणार आहे. तर काही कर्मचाऱ्यांना समुहाच्या अन्य कंपनीत सामील करून घेण्यात येणार आहे.

इकोनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार टाटा टेलिसव्हिसेज्वर खूप मोठे कर्ज आहे. त्यामुळे कंपनी लवकरच बंद होणार आहे. कंपनीने आपल्या सर्व परिमंडळाच्या प्रमुखांना 31 मार्च 2018 पर्य़ंत राजीनामा देण्यास सांगितले आहे. टाटा कंपनीच्या अन्य कंपन्यांवरही टांगती तलवार आहे.

टीटीएसला सोडून अन्य कंपन्यांवर सुमारे 25.2 अरब डॅालरचे कर्ज आहे. टाटा टेलिसव्हिसेजला नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी 50 ते 60 कोटी रूपये पाहिजे. टाटा समुहाने टाटा स्टील कंपनीचा युरोपातील आणि भारतातील व्यवहार स्वतंत्र केले आहेत.

Leave a Comment