मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुनील तटकरेंवरील पुस्तकाचे प्रकाशन


मुंबई: राजकीय कारकीर्दीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची तीन दशके पूर्ण होत असून त्यांचे व्यक्तित्व, कर्तृत्वाचा आलेख मांडणाऱ्या “समग्र” या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन संध्याकाळी सहा वाजता करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तटकरेंवर सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप केले आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर आक्षेप घेतला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, अजित पवार, संजय राऊत, सुप्रीया सुळेंचीही उपस्थिती आहे.