मिथुनचा मुलगा मिमोह फिरतो आहे पॉर्न स्टारसोबत


सध्या सोशल मीडियात मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाअक्षय चक्रवर्ती चांगलाच चर्चेत आला असून सोशल मीडियात महाअक्षयने एक फोटो शेअर केला आहे. तो या फोटोमध्ये एका प्रसिद्ध पॉर्न स्टारसोबत दिसत आहे.

महाअक्षय या फोटोत केडन क्रॉस या पॉर्न स्टारसोबत दिसत आहे. त्याने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्याने यावेळी केडनला भेटल्यावर झालेला आनंद व्यक्त केला आहे. मिमोह या नावानेही महाअक्षयला ओळखले जाते. तो सध्या लॉस एंजेलिसमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.


२०१५ मध्ये आलेल्या ‘इश्केदारियां’ या चित्रपटात मिमोह हा दिसला होता. त्याने २०११ मध्ये बॉलिवूडमध्ये आलेल्या हॉन्टेड थ्रीडी मधून एन्ट्री घेतली होती. पण हवे तसे यश त्याला मिळू न शकल्यामुळे तो सिने इंडस्ट्रीपासून दूर आहे. आता त्याची बहिण बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे.