‘लाईक’ बटनच्या निर्मात्याचाच फेसबुकला रामराम


फेसबुकसाठी 10 वर्षांपूर्वी लाईक बटनचा आविष्कार करणाऱ्या सॉफ्टवेयर इंजीनियरनेच आपल्या मोबाईल अॅपमधून फेसबुकचे अॅप काढून टाकले आहे. सोशल मीडिया संकेतस्थळे धोकादायक नशेसारख्या असल्याचे त्याने म्हटले आहे.

जस्टिन रोसेंसटीन असे या संगणक अभियंत्याचे नाव आहे. लाईक आणि डिसलाईकचा हा खेळ आपल्या मेंदूवर ताबा मिळवत आहे, एक प्रकारे तो आपल्या मेंदूचे अपहरण करत आहे. आपल्या पोस्टवर अधिक लाईक मिळविण्याची इच्छा मेंदूवर खोलवर असर करते. अपेक्षित लाईक्स न मिळाल्याने व्यक्ती डिप्रेशनची बळीही होऊ शकते. , असे जस्टिनचे म्हणणे आहे.

“सोशल मीडियाची ही नशा माझ्यावर चढली होती. याचा धोका ओळखूनच मी स्वतःच्या मोबाईलमधून फेसबुक डिलीट केले. मी स्नॅपचॅट, रेडिट आणि इन्टाग्राम असे अॅप्सही काढून टाकले आहेत,” असे जस्टिनने सांगितले.

जस्टिनने फेसबुकसाठी 2007मध्ये लाईक बटन तयार केले होते आणि ते आजपर्यंत फेसबुकचे सर्वात लोकप्रिय वैशिष्ट्य आहे.

Leave a Comment