वॉशिंग्टन – जीसटी आणि नोटबंदी अशा उपक्रमांमुळे अर्थव्यवस्थेवर अपेक्षित परिणाम साधत असल्याचे देशाचे वित्त मंत्री अरुण जेटली यांनी सांगितले आहे. करदात्यांच्या संख्येत वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेतील चलनात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. बर्कली इंडियाच्या कार्यक्रमात जेटली व्हिडिओ कॉन्फरन्समधून बोलत होते.
अर्थव्यवस्थेवर जीसएटी आणि नोटबंदीमुळे अपेक्षित परिणाम – जेटली
वित्त मंत्री अरुण जेटली म्हणाले मला आशा आहे की भारत त्याचा पूर्वीचा विकासदर गाठेल आणि नागरिकांच्या महत्त्वांकाक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरेल. कारण आम्हाला देशसेवा करत असल्याची जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले. एक देश एक करप्रणाली अस्तित्वात आणणे जीएसटीमुळे शक्य झाल्याचेही त्यांनी म्हटले. जेटली यांनी यावेळी काश्मीरमधील दहशतवादाचा प्रश्नही उपस्थित केला. दगडफेक करण्यासाठी सुमारे ५००० समाजकंटकांना दहशतवादी संघटना पैसै पुरवित असल्याची त्यांनी वस्तुस्थितीही सांगितली. अमेरिकेच्या कॉर्पोरेट वर्ल्डबरोबर चर्चा करण्यासाठी जेटली आठवडाभराच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते न्यूयॉर्क आणि बोस्टनमधील आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तसेच जागतिक बॅंकेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.