पोटावर झोपून चालविता येणारी सायकल


सायकल सवारी बहुतेकांनी आयुष्यात कधी ना कधी केलेली असतेच. पण आपल्याला पडल्यापडल्या सायकल चालवायची असेल तर त्याची सोयही केली गेली आहे. सॅन डियागो येथील एका माणसाने या सायकलचे डिझाईन केले आहे. ती पोटावर झोपून चालविता येते व तीही चक्क ताशी ७३ किमीच्या वेगाने. बर्ड ऑफ प्रे असे या सुपरसायकलचे नामकरण केले गेले आहे.

या सायकल इतकीच तिची किंमतही चर्चेत आली आहे. या सायकलसाठी ग्राहकाला ४८०० डॉलर्स म्हणजे ३ लाख २० हजार रूपये मोजावे लागणार आहेत. म्हणजे या सायकलची किंमत स्पोर्टस बाईक इतकी आहे.

ही सायकल ज्याने तयार केली आहे त्याच्या म्हणण्यानुसार आपल्या सर्वसामान्य सायकलमध्ये आपले कमरेवरचे शरीर उभ्या स्थितीत असते. परिणामी सायकलला वेग घेता येत नाही कारण शरीरामुळे हवेला प्रतिकार केला जातो. म्हणजेच साध्या सायकलींमध्ये एअरोडायनामिक्सची कमतरता असते. या डिझाईनमध्ये शरीराचा हा भागही पोटावर झोपल्यामुळे आडव्या स्थितीत राहतो, त्यामुळे हवेला प्रतिकार होत नाही व सायकल वेगाने चालविणे शक्य होते.

Leave a Comment