Skip links

बहुप्रतिक्षीत ‘पद्मावती’चा ट्रेलर रिलीज


संजय लीला भन्साली यांच्या बहुचर्चीत ‘पद्मावती’ चित्रपटाचा पहिला ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून या ट्रेलरची वाट पाहत होते.

दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, शाहीद कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘पद्मावती’ चित्रपटातील या कलाकारांचे लूक्स रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर ट्रेलर आज लॉन्च करण्यात आल्यामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. चित्रपटाचे भव्य रूप काय असेल हे ३ मिनिटांच्या या ट्रेलरमधून बघायला मिळते.

सुरूवातीपासूनच अनेक वादांमध्ये अडकलेला हा ऎतिहासिक कथेवरील चित्रपट येत्या १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर या चित्रपटात काही आक्षेपार्ह आढळल्यास चित्रपट प्रदर्शीत होऊ न देण्याचा इशारा राजस्थानमधील काही संघटनांनी दिला आहे.

Web Title: awaited 'Padmavati' trailer release