डाळींच्या किंमती कमी होणार ?


मुंबई – सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण बहुसंख्य डाळीच्या किंमती या 50 रूपये किलोच्या जवळपास येणार आहेत. डाळींच्या किंमती कमी करून केंद्र सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या प्रयत्नात आहे.

सध्या डाळींच्या किंमती या 80 ते 100 रूपये किलोच्या दरम्यान आहेत. सरकारकडे सध्या 18 लाख टन डाळींचा साठा आहे. यातील 5.5 लाख टन डाळीचे वाटप केंद्र सरकार राज्यांना मध्यान्य भोजन सारख्या योजनाच्या माध्यमातून करणार आहे. एखादी नवीन योजना केंद्र सरकार जाहीर करू शकते.

केंद्र सरकारकडून सुमारे 3.5 लाख टन डाळ कमी किमंतीत कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलगंणा यांना देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने नुकतीच 2 लाख टन डाळींची विक्री कमी किंमतीत विक्री केली आहे. अजून 2 लाख टन डाळ विकणार आहे. कमीत कमी 10 लाख टन डाळ बाजारात उपलब्ध झाली पाहिजे. अन्य राहिलेल्या डाळींची विक्रीबाबत केंद्र सरकार नंतर विचार करणार आहे.

केंद्र सरकाने मोठ्या प्रमाणात डाळ बाजारात उपलब्ध करून दिली, तर साहजिकच तिच्या किमंती कमी होतील, अशी अपेक्षा कृषीतज्ज्ञांना आहे. पण बाजारात उपलब्ध झालेल्या डाळींचा व्यापाऱ्यांनी बेकायदा साठा न केल्यास सर्वसामान्यांच्या खिशाला या डाळी परवडतील. पण यामुळे शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण येणाऱ्या डाळींच्या उत्पादनांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे कृषीतज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Comment