भारतात लॉन्च झाला चार कॅमेरे असलेला हॉनर ९आय


मुंबई : भारतामध्ये हॉनर ९आय हा स्मार्टफोन मोबाईल कंपनी हुवाईने लॉन्च केला आहे. अनेक वेगवेगळी फिचर्स या नव्या फोनमध्ये देण्यात आली आहेत. याआधी सप्टेंबरमध्ये मायमँग ६ चीनमध्ये हुवाईने लॉन्च केला होता. मायमँगमधीलच काही फिचर्स हॉनर ९आयमध्ये देण्यात आले आहेत. फ्रंट आणि रियर पॅनलमध्ये दोन-दोन कॅमेरे हॉनर ९आय या स्मार्टफोनमध्ये देण्यात आल्यामुळे एकूण चार कॅमेरे या फोनमध्ये आहेत. या स्मार्टफोनमध्ये असलेला फुलव्हिजन डिस्प्ले कॅमेरा इतर फोनपेक्षा वेगळा आहे. १७,९९९ रुपये एवढी हॉनर ९आय या स्मार्टफोनची किंमत आहे. सध्या हा स्मार्टफोन ई कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवरच उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर हा फोन १४ ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

हॉनर ९आय या स्मार्टफोनची स्क्रीन ५.९ इंचांची असून रिझोल्यूशन २१६०X१०८० पिक्सल आहे. मेटल बॉडीचा डिस्प्ले असणाऱ्या या फोनमध्ये रियर पॅनलमध्ये १६ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचे सेंसर आहेत. कॅमेरा सेटअप व्हर्टिकल आहे आणि एलईडी फ्लॅशला ऍंटीना बँडमध्ये इंटीग्रेट करण्यात आले आहे. पीडीएएफ आणि ऑटोफोकसबरोबर दोन्ही सेंसर येतात. या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी १३ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचे फ्रंट कॅमेरे असणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये ४जीबी रॅम आहे. तर २.३६ गिगाहर्ट्सचा ऑक्टो-कोर किरीन ६५९ प्रोसेसर आहे. फोन किरीन प्रोसेसर असल्यामुळे गरम होत नाही. फोनची इनबिल्ट स्टोरेज ६४जीबी आहे. हॉनर ९आयच्या बॅटरीची क्षमता ३३४०mAhएवढी आहे. या फोनमध्ये ४जी एलटीई, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, ग्लोनास, यूएसबी ओटीजी, ३.५ एमएम ऑडिओ जॅक, यूएसबी २.० टाईप सी पोर्ट आहे. याचबरोबर फोनमध्ये ग्रॅव्हिटी सेन्सर, लाईट सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, फिंगरप्रिंट सेन्सर, कंपास सपोर्ट आणि एनएफसी सपोर्ट आहे.

Leave a Comment