पोस्टातील ठेवींसाठीही आधार क्रमांक अनिवार्य


नवी दिल्ली – सरकारकडून आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी अनेक योजनांमध्ये आधार कार्ड सक्तीचे करण्यात येत असून आता पोस्ट कार्यालयामधील बचत खाते, पीपीएफ, राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी), आणि किसान विकास पत्र यासाठी आधार क्रमांक संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सध्या खातेधारक असणा-यांना आधार क्रमांक खात्याबरोबर जोडणे आवश्यक आहेत. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने चार अधिसूचना जारी केल्या असून या अधिसूचनेत पोस्ट कार्यालयांमध्ये बचत खाते, पीपीएफ, एनएससी आणि किसान विकास पत्र यासाठी खाते सुरू करण्यासाठी आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आल्याचे म्हणण्यात आले आहे. कोणत्याही व्यक्तीला आधार क्रमांक मिळाला नसल्यास अर्जाची प्रत सादर करावी लागेल. सध्या खातेधारक असणाऱयांनी संबंधित कार्यालय अथवा पोस्ट कार्यालयामध्ये आधार क्रमांक सादर करावा असे सांगण्यात आले.

Leave a Comment