38 मुलांची 37 वर्षीय आई…


नवी दिल्ली – आई होणे हे कुठल्याही महिलेच्या आयुष्यातील आनंदायी बाब असते. पण एखाद्या महिलेने आपल्या 37 वर्षीय आयुष्यात 38 मुलांना जन्म देणे ही कहाणी काही वेगळीच आहे. युगांडा येथील 37 वर्षीय मरियम नबातांजी या महिलेने आतापर्यंत 38 मुलांना जम्म दिला आहे.

युगांडा येथील मुकोनो जिल्ह्यातील कबिम्बिरी गावात राहणाऱ्या मरियमचे वयाच्या 12 व्या वर्षी लग्न झाले. तिने 13 व्या वर्षी तिने एका मुलाला जन्म दिला. मरियम हीने आतापर्य़ंत सहा वेळा जुडवा, चार वेळी तिळे अशा मुलांना जन्म दिला आहे.

मुलांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी मरियमने डॅाक्टरांचा सल्ला घेतला होता. पण डॅाक्टरांनी तिला सांगितले की जर ती आई होणार नाही, तर तिच्या जीवाला धोका पोहचू शकतो. पण काही डॅाक्टरांच्या मते हा चुकीचा सल्ला मरियमला दिला गेला होता. जर मरियमने कुंटुबनियोजनाचे काही उपाय केले असते तर तिला गर्भधारणा झाली नसती.

तिच्या गावातील नागरिक मरियम हीला मुले जन्म देणारी मशिन म्हणतात. मरियम हीच्या वडीलांना विविध महिलांपासून 45 मुले होते. हे जीन्स तिच्या उतरले असल्याचे डॅाक्टरांचे म्हणणे आहे.