कांही महिन्यांतच भारतीय युजर्सच्या हातात जगातील सर्वात सुरक्षित व हॅकप्रूफ असा स्मार्टफोन येऊ घातला असून या फोनचे नाव आहे ब्लॅकचेन. ब्लॅकव्होल्ट असेही त्याला म्हटले जाते. या फोनचे वैशिष्ठ असे की यावरून केले गेलेले कॉल टेलिकॉम ऑपरेटर रेकॉर्ड करू शकणार नाहीत तसेच या फोनवरून केले जाणारे सर्व आर्थिक व्यवहार इंटरनॅशनल ऑनलाईन करन्सी बिटकॉईनवरून केले जातात. यामुळे हा फोन सेलिब्रिटी, राजकारणी, अंडरवर्ल्ड, उद्योगपतींच्या हातात नक्कीच दिसेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
सर्वात सुरक्षित, हॅकप्रूफ स्मार्टफोन ब्लॅकचेन भारतात लवकरच
या फोनवरून केले जाणारे कॉल सर्वात सुरक्षित असल्याचा दावा कंपनीने केला असून हा फोन पुढच्या वर्षीच्या सुरवातीला भारतात येईल. हा फोन लंडनमध्ये या महिनाअखेरी लाँच केला जात आहे. या फोनसाठी ४ जीबी रॅम, ६४ जीबी मेमरीसह अन्य फिचर्स बाकी स्मार्टफोनप्रमाणेच आहेत. मात्र जगातील हा पहिला क्रिप्टो कम्युनिकेशन स्मार्टफोन आहे. तो ऑनलाईन करन्सी बिटकॉईनच्या बेस संगणकाशी जोडलेला आहेच पण तो अनेक प्रकारच्या बिटकॉईन स्पेशल अॅपला सपोर्ट करतो. परिणामी जगभरात कुठेही पैशांचे व्यवहार बिटकॉईनच्या रूपात करता येतात.
या फोनवर कोणतीही फाईल मॉडिफाय करता येत नाही त्यामुळे हा फोन हॅक होण्याची शक्यता नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या फोनमध्ये कॉल ब्लॅकचेन नेटवर्कचा वापर अ्राहे परिणामी ऑपरेटर तुमचा कॉल ट्रॅक करू शकत नाही कारण कॉल करताना निर्माण होणारा क्यूअ्रारकोड कॉल संपताच आपोआप नष्ट होतो.
या फोनचे उत्पादन भारतात डब्ल्यूडीएन टेक्नॉलॉजी तर्फे गुडगांव येथे केले जाणार आहे. या फोनची किंमत साधारण ८० हजार रूपये आहे.