मुंबई शिर्डी विमान रद्द


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १ आक्टोबरला सुरू झालेल्या मुंबई शिर्डी विमानसेवेला पाच दिवसांतच घरघर लागल्याचे दिसून आले आहे. मुंबई शिर्डी विमान सेवा दररोज आहे मात्र बुधवारी ही फ्लाईट कॅन्सल झाली. एअर इंडियाच्या अधिकार्‍यांनी मुंबईतून विमान लेट झाले व सायंकाळी शिर्डी येथे लँडींगची सोय नसल्याने फ्लाईट कॅन्सल केल्याचे कारण दिले आहे.

अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या विमानसेवेला प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद आहे. बुधवारी या फ्लाईटसाठी केवळ २२ प्रवासी होते. इतक्या कमी प्रवासी संख्येसह फ्लाईट नेणे विमान कंपनीला परवडणारे नाही म्हणून ती कॅ न्सल केली गेली.

Leave a Comment