मास्टरकार्ड भारतात कंपन्या अधिग्रहणाच्या तयारीत


कार्ड पेमेंट सेवा देणारी अमेरिकन कंपनी मास्टरकार्डने भारतात कंपन्या अधिग्रहणाची तयारी सुरू केली असून येत्या ४ ते ५ वर्षात ८० कोटी डॉलर्सची गुंतवणूक या कामी केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.जागतिक आर्थिक मंचच्या भारतातील आर्थिक संमेलनात कंपनीचे अध्यक्ष अजय बंगा यांनी ही माहिती दिली.

बंगा म्हणाले भारतात आम्ही विस्तार करतो आहोत. आम्ही १-२ कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे व आणखी ४ ते ५ कंपन्यांचे अधिग्रहण करण्याचा आमचा मानस आहे. त्या दृष्टीने कांही कंपन्यांबरोबर चर्चा सुरू आहे. आमच्या कमाईतील ३ ट्क्के हिस्सा भारताकडून येतो. कंपनीने आत्तापर्यंत भारतात ४.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे व येत्या ४ ते ५ वर्षात आणखी ८० कोटी डॉलर्स गुंतविले जाणार आहेत.

Leave a Comment