सप्टेंबर आक्टोबर नंतरचा काळ जगभरातील सर्व देशांतच साधारण सणसमारंभ, उत्त्सव, लग्नसमारंभ यांचा काळ असतो. कॉलेजमध्ये जाणार्यांसाठी हा काळ गॅदरिंग्ज, पिकनिक्स यांचा असतो. त्यामुळे या सीझनसाठी तरूणाई आपण विशेष आकर्षक कसे दिसू याकडे विशेष लक्ष पुरवित असते व त्यातून नवीन ट्रेंड कोणते याचा अभ्यास केला जातो.
या सीझनला इलेक्ट्रीक हेअरकलर्सची क्रेझ
यंदाच्या वर्षी केसांबाबत सांगायचे तर केस इलेक्ट्रीक म्हणजे शॉकिंग कलर्सने रंगवून घेण्याच्या फॅशनची चलती आहे. यापूर्वीही केस रंगवून घेण्याचा ट्रेंड होताच पण त्यात कांही ठराविक रंगांनाच अधिक पंसती दिली जात असे. त्यात सर्वसाधारणपणे लालसर, बुरगुंडी, तपकीरी, सोनेरी रंगांना पसंती होती. आता मात्र मल्टीकलरची फॅशन डोक्यावर दिसते आहे. बाजारात व पार्लरचालकांकडून मिळालेल्या माहितीनुसार ब्राईट कलर्सना यंदा मागणी आहे. या नव्या शेडस तरूणाईला नवीन लूक देण्यास तसेच त्यांची पर्सनॅलिटी अधिक उठावदार बनविण्यास उपयुक्त ठरताना दिसत आहेत.
युवतींमध्ये निळा, हिरवा, लाल, राखाडी, सिल्व्हर रंगांना अधिक पंसती आहे तर युवक मेट ब्लू, पर्ल अॅश व सिल्व्हर कलर मध्ये केसांना सजविण्यास प्राधान्य देत आहेत. चेहर्यानुसार केस अॅडजस्ट केले जात आहे. यंदाचे वैशिष्ठ म्हणजे हे कलर्स ऑरगॅनिक आहेत तसेच त्यांच्या वापरामुळे केस अधिक मजबूत होण्यास मदत मिळत असल्याचेही सांगितले जात आहे.