देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआय च्या अध्यक्षपदी केंद्र सरकारने बुधवारी रजनीशकुमार यांच्या नावाला संमती दिली आहे. रजनीशकुमार ७ आक्टोबरला अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. त्यांची ही नेमणूक तीन वर्षांसाठी आहे. सध्या ते स्टेट बँकेत व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरतआहेत.
एसबीआयच्या अध्यक्षपदी रजनीशकुमार
रजनीशकुमार यांनी स्टेट बँकेत प्रोबेशनरी ऑफीसर म्हणून कामाची सुरवात केली होती. त्यानंतर त्यांनी बँकेच्या विविध विभागात काम केले आहे. सध्याच्या अध्यक्ष अरूंधती भट्टाचार्य यांचा कार्यकाल ६ आक्टोबर रोजी संपत आहे. त्यानंती हा पदभार २०१३ साली स्वीकारला होता मात्र तीन वर्षांची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक वर्षाचा कालावधी याच पदावर वाढवून दिला गेला होता. अरूंधती या स्टेट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या होत्या.